About Us

ब्रावो मराठी मंडळ

⇒ English

माझीया मराठीची बोलू किती कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके।

उद्दिष्ट:

संत ज्ञानेश्वरांनी वर्णिलेल्या मराठी मायबोलीचा महिमा,  सर्व मराठी समुदायाला  एकत्र आणून तो जतन करणे आणि महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध अशा विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा वारसा जपून त्याचा प्रसार करणे.

ब्रावो मराठी मंडळाच्या माध्यमातून आपण जर्मनीमध्ये, मातृभूमीपासून दूर राहणाऱ्या भारतीय बांधवांना एकत्र आणून याद्वारे आपली मराठी पाळेमुळे,  संस्कृती, भाषा व उत्सव  यांचे जतन व संवर्धन करण्याचे काम करत आहोत. मंडळाने आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे आपला “मराठी बाणा” बळकट होऊन ह्या मातीत घट्ट रुजेल.

ध्येय: विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून  लोकांना एकत्र आणणे.

ब्रावो मराठी मंडळ ही एक ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारी संस्था आहे  आणि तिची स्थापना मार्च २०२० मध्ये झाली. ब्रावो मराठी मंडळ हे Braunschweig, Wolfsburg आणि Hannover ह्या भागामधील पहिले नोंदणीकृत मराठी मंडळ (e.V.)आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे या मंडळाला उत्साही, हरहुन्नरी, कलागुण संपन्न आणि अनुभवी अशा सदस्यांचे मजबूत पाठबळ आहे आणि ह्यामुळेच हे मंडळ मराठी उत्सव, खाद्यसंस्कृती, नाटक, लोकगीत, शास्त्रीय संगीत आणि  नृत्य अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करु शकते.

भारतीय वाणिज्य दूतावावासाचा सहयोग, ब्रावो मराठी मंडळाची जर्मनीतील इतर मराठी मंडळांशी असलेली सहकार्याची भूमिका तसेच प्रादेशिक अधिकाऱ्यांचा मदतीचा हात यामुळेच मंडळाला भारतातील प्रतिभावंत कलाकारांसमवेत दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याच्या संधी उपलब्ध  झाल्या आहेत.

ब्रावो मराठी मंडळ हे आपल्या भावी पिढीसाठी मराठी भाषेची साक्षरता तसेच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठीचे अनेक उपक्रम पुढाकार घेऊन राबवत आहे.

ब्रावो मराठी मंडळ आणि पूर्ण टीम ही नुकत्याच जर्मनीमध्ये आलेल्या बांधवांचे  नवीन वातावरणातील  स्थित्यंतर सुलभ होण्यासाठी आनंदाने ऐच्छिक मदत करते.


BraWo Marathi Mandal

मराठी 

Vision : Preserve and Spread our rich ‘Marathi Culture and Heritage‘

At BraWo Marathi Mandal, we aim to bring people closer and preserve our Marathi roots, culture, language and festivals for Indian families in Germany. We are keen to strengthen our “Marathi Bana” through various cultural & social initiatives.

Mission: Binding our People together through various Cultural and Social Initiatives

BraWo Marathi Mandal is a Non-Profit Organization and was established in March 2020 thus becoming the only Marathi Mandal to be officially registered in the Hannover, Braunschweig and Wolfsburg Region.

The Mandal is backed by a strong team of versatile, multi-faceted and experienced committee members and arranges various events covering all important Marathi festivals, cuisine, theater, folklore, classical singing and traditional dance form.

BraWo Marathi Mandal works closely with other Mandals in Germany, with the Consulate General of India in turn also with the regional authorities which provides us many opportunities like bringing talented artists from India.

We spearhead many initiatives for our future generation including Marathi language literacy as well initiatives for environmental causes.

We are happy to provide voluntary support in smooth settling for the ones who have recently shifted to Germany & help them integrate in the new environment.


मराठी 

In order to optimize our website for you and to be able to continuously improve it, we use cookies. By continuing to use the website, you consent to the use of cookies. Further information on cookies can be found in our privacy policy.

Privacy policy